लाज वाटते राजे, या जगात जगाव लागतं
समाजाच अध:पतन, उघड्या डोळ्यांनी बघाव लागतं
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत.....
कायदा सुव्यवस्थेला कुणी भीत नाही राजे,
सुभेदाराची सूनही इथे सुरक्षित नाही राजे,
आया,बहिणी,लेकी,सुना पवित्रा राहिली नाहीत नाती,
शासन करणार्या तलवारींची गंजून गेलीत पाती,
आपल्या अब्रुच लक्तर,अब्रू झाकण्यासाठीच मागाव लागत
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत
हिंदवी स्वराज्य स्थापन करून तुम्ही निघून गेलात राजे,
राष्ट्रप्रेमाच स्फुलिंग पेटवून तुम्ही निघून गेलात राजे,
पण......या पेट्लेल्या राष्ट्रप्रेमावर स्वत:ची पोळी भाजणार्या
आणि आमचीच मतं घेऊन, शेवटी सत्तेने माजणार्या
गल्ली बोळातल्या पुढार्याला, "रयतेचा राजा" म्हणाव लागत,

इंग्रज इथं दीडशे वर्षे राज्य करून निघून गेले,
भारतीयांच काय पाणी,ते भारतात राहून बघून गेले
भारतीय संस्कृतीच्या छाताडावर, आता पाश्चात्य संस्कृती नाचतेय,
महाराष्ट्रीयन तुतारीच्या नावाखाली, इथं इंग्रजीचीच पिपाणी वाजतेय,
माय मराठी मरतेय राजे आणि इंग्रजीला पालखित बघाव लागत
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत........
जांच्याकडे पैसा आहे, त्यांच जगण झालय मस्त,
नि पोटासाठी राबणार्याच इथं मरण झालय स्वस्त,
किड्यामुंग्यांसारखी इथं जगताहेत माणसं,
दिवसाढवळ्या आपल मरण बघताहेत माणसं,
वेदना असह्य होतात, म्हणून इच्छामरण मागाव लागत....
नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत......
तुमच्यासारखा छत्रपती पुन्हा इथं झाला नाही,
पुन्हा कुठल्या जिजाऊपोटी शिवबा जन्माला आला नाही,
घराघरातल्या जिजाऊ आता करियर वुमन होत आहेत,
आता एक करा राजे यापुढे प्रेरणा कुणाला देऊ नका,
अंन् कृपा करून तुम्ही आमच्या स्वप्नातही येऊ नका.
काय सांगू राजे, आता इथल्या तरुणाईबद्दल बोलवत नाही.
नी तुमच्या आदर्शांच ओझ, इथल्या तरुण खांद्याना पेलवत नाही
कर्तव्य विसरून आमची तरुणाई, आपल्याच मस्तीत मग्न आहे.

अन्याय, अत्याचार, अधर्मावर इथल्या माणसाच जिवापाड प्रेम जडलाय,
आणि हिंदुपतपातशाहीवर राजे, दहशदवादाच सावट पडलय ,
बॉम्बस्फोटाच्या भीतीने,वारा सुगंध देत नाही,
नी आपल्याच मातृभूमीत राजे, मोकळा श्वासही घेता येत नाही,
गुंड सुटतात मोकाट आणि निर्दोषांना वर्षानुवर्ष न्यायालयात लढाव लागत

स्वराज्य आहे इथं राजे,पण सुराज्याची पर्वा नाही,
म्हणतात ना..... कौरव सारे माजले आहेत आणि पांडवांची सत्ता नाही.
विरोध करण्याची हिंमत जाउन निष्क्रियता पक्की मुरली आहे
माझीही तलवार बोथट झालिये आता फक्त शब्दांनाच धार उरली आहे,
समाज परिवर्तनाच चक्र इथं दुबळ्या हातांनाच फिरवावी लागतात

ताठ मानेंन जगाव म्हटल तर राजे आपलीच माणसं जगू देत नाहीत,
आणि भ्रष्टाचारमुक्त, अखंड भारतच स्वप्न पाहु देत नाहीत,
तरी बर तुमचच रक्त वाहताय, माझ्या नसांनसांमधून म्हणून लिहाव लागत
पण तरीही लाज वाटते राजे या जगात जगाव लागत.....
जातील राजे नक्की जातील, हेही दिवस एक दिवस,
स्वताच्या चुकांची जाणीव होईल प्रत्येकालाच एक दिवस,
मात्र त्यासाठी प्रत्येकाने, प्रयत्न करायला हवेत,
बूडणार्याला काडिशिवाय, दुसरं काय लागतं तरायला?
पुन्हा एकदा त्याच डौलान, भगवा झेंडा फडकणार,
कुणाच्याही चिथावनीने, आमची माथी नाहीत भडकणार...
जय भवानी!!!
जय शिवाजी!!!
जय महाराष्ट्र........
जय भारत.............

JAY MAHARASHTRA!!!!
ReplyDelete“लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं...!!”, ही कविता माझी स्वतःची आहे...... आणि या व अशा प्रकारच्या वांग्मयीन चौर्याचा मी निषेध करतो......... http://www.facebook.com/photo.php?fbid=332855320098185&set=a.145802922136760.40516.100001211600673&type=3&theater मी नेहमी सांगत असतो, की कोणतीही रचना तुम्हांला आवडली तर किमान त्या कवीचे, लेखकाचे नाव त्या साहित्यकृती बरोबर राहु द्यात... माझ्या कोणत्याही कवितेबरोबर माझे नाव कवी म्हणून असलेच पाहिजे हा माझा अट्टाहास नाही तर माझा हक्कच आहे आणि हे दुस-यांच्या लेखनाचे बिनधास्तपणे Copy & Paste करणे आणि स्वत:च्या नावावर खपवणे या फेसबुकवर नित्याचेच झाले आहे.... आपण कोण आहात हे मला माहित नाही, पण या प्रकारचे निंदनीय कृत्य करण्यापुर्वी किमान स्वतःची तरी शरम बाळगून या कवितेतील विचारांची अशी हत्या करणे म्हणजे या कवितेची फार मोठी बदनामी करणे आहे. मी कधीही दुसऱ्यांचे लिखाण चोरून स्वतहाच्या नावावर खपवत नाही, तुम्हीही असे करू नका... किमान, “हे लिखाण माझे नाही” असे सांगण्याचा तरी मनाचा मोठेपणा दाखवा.... इतके वैचारिक दारिद्र्य दाखवून मूळ लेखक, कवींचा अपमान करू नका, ही नम्र विनंती. अन्यथा मला Copyright Act खाली कायदेशीर कारवाई करावी लागेल..... माझी कोणतीही पूर्वपरवानगी ना घेता संपर्क ना करता खुशाल स्वतःच्या नावावर ही कविता खपविणा-या या वांग्मयीन चौर्यावर कायदेशीर कारवाई का करू नये....? तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत, आपला विनम्र प्रा. गुरुराज गणेश गर्दे समुपदेशक, घरचा पत्ता :- ८४१ दुर्गानिवास, बांदा. ता. सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग. ४१६५११. सध्या वास्तव्य :- डीएसके विश्व, धायरी, पुणे. सहजसंपर्क :- 9021501924 rajgarde@gmail .com
ReplyDeleteही कविता गर्दे सरांची आहे
ReplyDelete